कोलंबियात विमान कोसळून 27 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कोलंबिया

कोलंबियात शनिवारी झालेल्या विमान दुर्घटनेत 27 प्रवासी ठार झाले आहेत. द डगलस डीसी 3 हे विमान मध्य पूर्वेत दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती कोलंबिया सरकारने दिली आहे. या विमानाला दोन इंजिन बसवण्यात आले होते. सान जोश देल गुआवियारे आणि विल्लाविसेंसियो या शहरा वरून जात असताना विमान कोसळले. इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे.

विमान दुर्घटनेत ठार झालेल्यांमध्ये तरैरा या शहराच्या महापौर, त्यांचे पती व मुलीचा समावेश आहे. तसेच विमानातील प्रवाशांबरोबरच सर्व क्रू मेंबर्सही या अपघातात ठार झाले आहेत.