शेख हसीनांची हॅट्ट्रिक! 350 पैकी 281 जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा पंतप्रधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hasina-bangladesh

सामना ऑनलाईन । ढाका

पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षाने सलग तिसऱ्यांदा निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. शेख हसीना या 2009 से बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. हसीना यांच्या आवामी लीगने 350 जागांपैकी 281 जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा त्यांच्या पक्षाने जिंकल्या आहेत.

दुसरीकडे बांगलादेशच्या विरोधी पक्षाने या निवडणुकांच्या निकालांना हास्यास्पद म्हटले आहे. तसेच पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली आहे. मतदानावेळी अनेक मतदान केंद्रांवर मतपेट्या आधीच भरलेल्या असल्याचे निदर्शनास आले होते. वृत्तवाहिन्यांनी देखील यासंदर्भात माहिती दाखवली होती. निवडणुक आयोगाने या गैरप्रकारांची माहिती घेऊन पुन्हा एकदा निष्पक्ष निवडणुका घ्याव्यात, अशी विनंती विरोधी पक्षाचे नेते कमाल हुसैन यांनी केली आहे.