माझे मौलिक सहकारी गमावले, पंतप्रधान मोदींनी अनंतकुमार यांना वाहिली श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-anantha-kumar

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

केंद्रीय मंंत्री अनंतकुमार यांचे कॅन्सरच्या आजारावर उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे निधन झाले. त्याच्या अचानक जाण्याने भाजपचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. आपल्या ट्वीटमधून मोदींनी अनंतकुमार यांना श्रद्धांजली वाहिली.

माझे मौलिक सहकारी आणि मित्र अनंतकुमारजी यांच्या निधनाचे वृत्त आल्याने मी अत्यंत दु:खी आहे. माझ्यासाठी ते उल्लेखनीय कामगिरी करणारे असे नेते होते, ज्यांनी तरुण वयात समाजसेवेचे व्रत घेतले आणि त्यात सर्वस्व ओतून काम केले, असे मोदींनी आपल्या ट्वीटमधून म्हटले आहे. तसेच या दुखद प्रसंगी आमच्या भावना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, असे म्हणत त्यांनी कुटुंबीयाचे सांत्वन केले आहे.