पवारांनंतर करिया मुंडाचे बोट पकडून मोदी आले राजकारणात

2623

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बोट पकडून राजकारणात आलो असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. त्यामुळे पवार हेच मोदींचे गुरू असल्याच्या चर्चाही रंगल्या. पण सध्या झारखंड दौऱ्यावर असणाऱ्या मोदींनी आता करिया मुंडा यांचे बोट पकडून आपण राजकारणात आल्याचे सांगितले आहे.

गडी भारीय… पाहिजे ते करतो अन् रोज माझे बोट धरतो!

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपमय वातावरण तयार करण्यासाठी मोदी मंगळवारी खुंटी य़ेथे गेले आहेत. येथे भाजपचे उमेदवार निलकंठ सिंह मुंडा यांचा प्रचार करण्यासाठी ते आले. यादरम्यान, त्यांनी जनसभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपमध्ये मी साधारण कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. पण करिया मुंडा यांचे बोट पकडून मी राजकारणात प्रवेश केला. मुंडा यांच्यामुळेच मला ग्रामीण भागाला ओळखण्या दृष्टीकोण मिळाला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झारखंडच्या विकासासाठी काम करत आहोत. असेही मोदी यावेळी म्हणाले. तसेच याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारने शेतकरी व गरजूंसाठी राबवलेल्या योजनांबद्दलही माहिती दिली.

नरेंद्र मोदींनी पकडले पवारांनंतर प्रणवदांचेही बोट

आपली प्रतिक्रिया द्या