Lok sabha 2019 लोकशाहीचा उत्सव आला, वेळापत्रक जाहीर होताच मोदींचे ट्वीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रविवारी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. सात टप्प्यात होणाऱ्या मतदानाची मोजणी 23 मे रोजी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाना लोकसभा निवडणुकांच्या तारखाची घोषणा करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लोकशाहीचा उत्सव आला’ असे ट्वीट केले आहे.

पंतप्रधान मोदी ट्विटरवर म्हणतात की, लोकशाहीचा उत्सव आला म्हणजे निवडणुकीचे पर्व आले आहे. मी आशा करतो की ही निवडणूक ऐतिहासिक होईल. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदात्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आव्हान मोदींनी केले. तसेच मोदींनी सर्व पक्षांना, उमेदवारांना आणि निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. आपण जरी वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी देशाचा विकास करणे हेच आपले लक्ष्य आहे, असेही मोदी ट्वीटमध्ये म्हणतात.