8 वर्षांत मोदींच्या विदेशवारीचे शतक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेशवारीही चर्चेचा विषय बनली आहे. कारण या आठ वर्षांत पंतप्रधान मोदींनी विदेशवारीचे शतक पूर्ण केले आहे. 2014 पासून आतापर्यंत त्यांनी तब्बल 110 हून अधिक विदेश दौरे केले. या दौऱयात त्यांनी 60 हून अधिक देशांना भेटी दिल्या.

भाजप सरकार केंद्रातील आठ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करीत असतानाच पंतप्रधान मोदींच्या विदेशवारीची चांगलीच चर्चा होत आहे. मोदींनी अमेरिकेत सर्वाधिक सातवेळा दौरा केला, तर फ्रान्स, जर्मनी, चीन आणि रशियाला पाचवेळा भेटी दिल्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून पहिली टर्म सुरू करतानाच 2015 मध्ये मोदींनी सर्वाधिक विदेश दौऱयांचा धडाका लावला होता. या वर्षभरात ते 28 वेळा परदेशात गेले होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांत जेवढे विदेश दौरे केले नाहीत, त्यापेक्षा अधिक दौरे मोदींनी 8 वर्षांत केले.