
सकाळची वेळ… निगडी बस डेपो परिसरात नेहमीप्रमाणे बससाठी धावपळ करणारे प्रवासी… आणि त्याच गर्दीत ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड सामान्य प्रवाशांप्रमाणे बसमध्ये चढताना दिसले. ‘तिकीट द्या’ म्हणत त्यांनी गर्दीच्या नमध्ये उभ्याने प्रवास केला आणि प्रवाशांच्या नच्या संघर्षाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्या पाश्र्वभूमीवर आव्हाड यांनी या काही आठवड्यांपासून दर सोमवारी बसने प्रवास सुरू केला आहे. निगडी येथील बसस्थानातून स्वारगेट येथील कार्यालयापर्यंत पीएमपीएमएल’च्या बसने जात असून, या प्रवासादरम्यान ते प्रवाशांशी थेट संवाद साधत आहेत. सोमवारी (२५ रोजी) त्यांनी निगडी-कात्रज मार्गावरील बसने प्रवास केला.
डेपोबाहेर उभ्या राहणाऱ्या ऑटोरिक्षांमुळे बसबाहेर पडण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे आव्हाड यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, ‘पीएमपीएमएल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दर सोमवारी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा, अशा सूचना आव्हाड यांनी दिल्या आहेत.
गर्दीच्या मार्गावर जादा बसेस
शहरातील काही मार्गांवर तुरळक, तर काही मार्गांवर जास्त गर्दी असते. विशेषतः ‘पीक अव्हर्स’मध्ये गर्दीचे हे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेकांना बसायलादेखील जागा मिळत नाही. या पाश्र्वभूमीवर गर्दीच्या मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
८८ बस प्रवास करताना अनेक प्रवासी नागरिकांशी संवाद साधला. प्रवाशांच्या सूचनांच्या आधारे ‘पीएमपी’ सेवा अधिक सक्षम आणि प्रवासीकेंद्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महेश आव्हाड, पीएमपी अध्यक्ष




























































