
एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. मो. युनुस मो. याकुब शेख ऊर्फ दानिश (26) असे आरोपीचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी युनुसविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कलम 354 व पोक्सो ऍक्टमधील कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुह्याचा अचूक तपास करून पोलिसांनी कोर्टात युनुसविरोधात सबळ पुरावे सादर केले होते. त्याआधारे 18 व्या न्यायालयाच्या न्यायाधीशांनी युनुसला पाच वर्षांचा सश्रम कारावास व सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.




























































