
अनलॉकनंतर पुणे शहरात सेक्स रॅकेट पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने पुणे-बंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्या ठिकाणाहून दोन मुलींची सुटका करून तिघांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र उर्फ जितू बाबासाहेब नंदिरे (वय 32, रा. काळेवाडी), रामकिसन व्यंकट जाधव (वय 35, जनता वसाहत) आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमुळे सेक्स रॅकेटला आळा बसला होता. मात्र , मागील काही दिवसांपासून अनलॉक करण्यात आल्यानंतर लॉजमध्ये अवैधरित्या व्यवसाय केला जात असल्याचे कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. विविध भागात छुप्या पद्धतीने अवैध प्रकार सुरू असल्यामुळे गुन्हे शाखेची चिंता वाढली आहे. पुणे- बंगळुरू महामार्गालगत वारजेतील एका लॉजमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संतोष भांडवलकर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी साई एक्झिक्युटिव्ह’ लॉजवर छापा टाकून दोन मुलींची सुटका केली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस अधिक तपास करीत आहे.




























































