प्रशांत महासागराच्या तळाशी असलेले प्रदूषण मानवासाठी धोकादायक, संशोधकांचा नवा शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत महासागरात 26,246 फूट खोलीपर्यंत प्रदूषण पसरले आहे. 20व्या शतकात मानवनिर्मित प्रदूषणापैकी 60 टक्के प्रदूषण समुद्राच्या खोल तळाशी साचले आहे. या या मानवनिर्मित प्रदूषकांवर बंदी घालण्यात आली होती. शास्त्रज्ञांनी एका संशोधनाद्वारे हा निष्कर्ष काढला.

पॅसिफिक महासागरात 26,246 फूट खोलीपर्यंत पोहोचलेल्या अटाकामा ट्रेंच या पृथ्वीवरील सर्वात खोल आणि दुर्गम ठिकाणी मानवनिर्मित प्रदूषक अलीकडेच सापडले आहेत. अशा दुर्गम ठिकाणी पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स (पीसीबीएस) आढळून आल्याने पृथ्वीवरील कोणातीही जागा प्रदूषणापासून मुक्त नाही, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

1930 ते 1970 च्या दशकात बहुतेक उत्तर गोलार्धात पॉलिक्लोरिनेटेड बायफेनिल्स (PCBs) ची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. हे इलेक्ट्रिकल उपकरणे, पेंट, कुलेंट आणि इतर अनेक वस्तूंकरिता याचा वापर केला गेला. 1960 च्या दशकात हे लक्षात आले की, यामुळे समुद्री जीवसृष्टीला हानी पोहोचत आहे. म्हणून 1970 च्या दशकाच्या मध्यात त्यांच्या वापरावर जागतिक स्तरावर बंदी घालण्यात आली.

पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स हे पाण्यात जिथून ते प्रथम वापरले गेले होते तिथून लांब प्रवास करू शकतात. ते समुद्राचे पाणी, वारा आणि नद्यांद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. अलीकडेच, दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवर सुमारे 6,000 किलोमीटर पसरलेल्या अटाकामा ट्रेंचमध्ये एक संशोधन करण्यात आले. येथून 2,500 ते 8,085 मीटरपर्यंत वेगवेगळ्या खोलीच्या पाच ठिकाणांहून गाळ गोळा करण्यात आला. पृष्ठभागावरील गाळापासून ते मातीच्या थरापर्यंत प्रत्येक नमुना पाच थरांचा असून त्या सर्व थरांमध्ये पीसीबी आढळले.

पृष्ठभागावर असलेले पाणी पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. याचे कारण समुद्राच्या तळाशी असणाऱ्या छोट्या जीवांमुळे या पाण्यात पोषक तत्त्वे मिसळली जातात. ज्यांना प्लँक्टन म्हणतात. जेव्हा प्लँक्टन मरतात तेव्हा त्यांच्या पेशी तळाशी बुडतात आणि PCB सारखे प्रदूषक तळाशी घेऊन जातात; परंतु PCB पाण्यात चांगले विरघळत नाहीत आणि त्याऐवजी चरबीयुक्त ऊती आणि जिवंत किंवा मृत जीवांचे तुकडे किंवा प्लँक्टनला चिकटतात. 20 व्या शतकात सोडण्यात आलेले सुमारे 60 टक्के पीसीबी खोल समुद्रातील गाळात साठवले जातात.

संशोधकांचे म्हणणे आहे की, सध्या जगभरात वापरात असलेली 350,000 हून अधिक रसायने पर्यावरणाला प्रदूषित करत आहेत. प्रशांत महासागराच्या तळाशी असलेले प्रदूषण मानवासाठी धोकादायक आहे.