दहिसरमधील मुरबाळीदेवी जलतरण तलावाची दुरवस्था  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या वतीने आज जोरदार निदर्शने

दहिसर पूर्व शुक्ला कंपाऊंडमधील मुरबाळीदेवी जलतरण तलावाची दुरवस्था झाली असून पालिका प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. या जलतरण तलावाची तत्काळ दुरुस्ती व्हावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र. 1 च्या वतीने आज, 29 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता या तलावाजवळ निदर्शने करण्यात येणार आहेत.

मुरबाळीदेवी जलतरण तलावाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या होत असलेल्या अपघाताच्या निषेधार्थ शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी, विभागप्रमुख उदेश पाटेकर, आमदार विलास पोतनीस,  विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक संजय घाडी यांनी दिली.