पॉर्न स्टार मिया खलीफा करणार दुसरं लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

पॉर्नस्टार मिया खलीफा ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मियाने गेल्या गुरुवारी तिचा स्वीडीश बॉयफ्रेंड रॉबर्ट सेंडबर्ग याच्यासोबत साखरपुडा केला आहे. मियाने सोशल मीडियावरून तिच्या लग्नाची माहिती दिली. मियाने तिचा व रॉबर्टचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून मी जगातली सर्वात लकी मुलगी आहे, अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोत मिआ तिची साखरपुड्याची अंगठी दाखवत आहे.

याआधी मियाने 2011 मध्ये तिच्या शाळेतल्या मित्राशी लग्न केले होते. त्यानंतर त्या दोघांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला होता. मिया गेल्या वर्षभरापासून रॉबर्टला डेट करत असल्याचे समजते. रॉबर्ट हा शेफ असून एका मोठ्या हॉटेलमध्ये तो काम करतो. मियाने काही वर्षांपूर्वी हिजाब घालून पॉर्न व्हिडीओ शूट केला होता. त्यावरून इसिसने तिचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली होती. मियाने 2015 साली पॉर्न इंडस्ट्री सोडली असून ती आता फक्त मॉडेलिंग करते.