मराठा नेत्यांनी आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा करू नये, प्रकाश आंबेडकर

मराठा समाजाच्या नेत्यांनी थोडा संयम बाळगायला हवा. त्यांनी आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करू नये. अधिक गोंधळ वाढला तर आरक्षण गमवायची वेळ येऊ शकते, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना केले आहे.

राज्यातील ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांसंदर्भात प्रकाश आंबेडकर साखर आयुक्तालयात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना ओबीसी समाजाने मन मोठे करून मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, असे काही मराठा नेत्यांनी म्हटलं असल्याबद्दल विचारले असता, आंबेडकर म्हणाले, मीदेखील गेले दोन-तीन दिवस हेच वाचतोय, मराठा समाजाला आरक्षण मिळावं; परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, थोडक्यात आमच्या  ताटातलं नको, अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे माझं मराठा समाजाच्या नेत्यांना असं आवाहन आहे की, त्यांनी हा वाद गुंतागुंतीचा करू नये आणि ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नये.

आपली प्रतिक्रिया द्या