सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज चंद्रपुरात भाषणादरम्यान जीभ घसरली आणि एका अश्लिल शब्दाचा वापर त्यांनी केला. ‘नोटाबंदीमुळे ना काळापैसा थांबला, ना दहशतवाद. याचा थेट फायदा चीनला करून दिला गेला. तिथल्या पेटीएम कंपनीला आपल्या देशात प्रोत्साहन देऊन आपल्याच पैशाने आपलीच Xड मारण्याचा प्रकार सरकारने केला’, असे ते भर सभेत म्हणाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चंद्रपुरात मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला एमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर प्रमुख अतिथी होते. मात्र ओवैसी अनुपस्थित राहिले. भरगच्च उपस्थिती असलेल्या या मेळाव्याला दुपारी चार वाजता सुरुवात झाली आणि रात्री सात वाजता सांगता झाली. या सभेत भाषणादरम्यान जीभ घसरली आणि एका अश्लिल शब्दाचा वापर प्रकाश आंबेडकर यांनी केला.




























































