डॉ प्रमोद येवले यांचेकडे अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार!

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी एका आदेशान्वये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांचेकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. यासोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरु नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ दिलीप मालखेडे यांच्या निधनामुळे दिनांक २८ जानेवारी पासून हे पद रिक्त झाले होते.