नववर्षाच्या स्वागतासाठी सिद्धिविनायक मंदिरात जय्यत तयारी

वर्ष सरायला आता अवघे दोन ते तीन दिवस राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन सिद्धिविनायक मंदिर तसेच महालक्ष्मी मंदिरासह विविध ठिकाणी देवदर्शनाने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. हे लक्षात घेऊन भाविकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, शिस्तीत दर्शन व्हावे यासाठी सिद्धिविनायक मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. मंडप उभारण्यापासून बॅरिकेड्स लावण्यापर्यंत सर्व कामे मार्गी लावण्यात येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.