अमरनाथ यात्रेसाठी जय्यत तयारी; 100 बेडचे हॉस्पिटल उघडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

52 दिवस चालणारी अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरु होत आहे. या यात्रेच्या तीन दिवस आधी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी बालटाल बेस कॅम्प येथे जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच 100 बेडच्या हॉस्पिटलचे उद्घाटनही केले. यात्रेदरम्यान तीर्थयात्रा आणि नियमित येणाऱया जाणाऱया वाहनांवर नजर ठेवण्यासाठी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. उधमपूर ते रामबनच्या बनिहाल पर्यंत 360 डीग्री सेर्वेलन्स करणारे 10 आणि पोलिस विभागाच्या गाडय़ा तसेच संशयित वाहनांची ओळख पटवण्यासाठी 60 क@मेरे लावण्यात आले आहेत.