Prithvi Shaw ‘व्हॅलेंटाईन डे’ला पृथ्वी शॉची पोस्ट व्हायरल, मॉडेलसोबत फोटो शेअर करत म्हटलं ‘वाईफी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा सलामीवीर खेळाडू पृथ्वी शॉ याने ‘व्हॅलेंटाईन डे’ला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. पृथ्वी शॉ याने सीआयडी फेम अभिनेत्री निधी तापडियासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीवर ठेवला होता. या फोटोखाली त्याने ‘हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे माय वायफी’ असे म्हटले. यानंतर काही वेळातच त्याने ही स्टोरी हटवली. मात्र तोपर्यंत याचे स्क्रीन शॉट व्हायरल झाले होते आणि या दोघांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा प्रसारमाध्यमांवर सुरू झाली.

पृथ्वी शॉ याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये एका मॉडेलसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या मॉडेलला पृथ्वीने ‘वाईफी’ (पत्नी) असे म्हटलेय. या फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मात्र त्याने मॉडेल निधी तापडियाला या पोस्टमध्ये टॅग केले आहे.

निधी तापडिया एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने सीआयडी या प्रसिद्धी मालिकेतही भूमिका केलेली आहे. याआधीही पृथ्वी आणि निधीचे पार्टी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या पसरू लागल्या होत्या. त्यानंतरही या जोडप्याने त्यांच्या नात्याबद्दल कधीही कोणतेही वक्तव्य केले नाही. पण आता शॉने पहिल्यांदाच उघडपणे निधीवरचे प्रेम व्यक्त केल्याची समोर आले आहे.

कोण आहे निधी तापडिया?

निधीने वयाच्या 16 व्या वर्षापासून कारकिर्दीची सुरुवात केली. 2016 पासून ती अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करतेय. सीआयडी या मालिकेव्यतिरिक्त ती 2019 मध्ये ‘जट्टा कोका’ या पंजाबी गाण्याच्या व्हिडिओत झळकली होती. हा व्हिडीओ खूप प्रसिद्ध झाला होता. निधी तापडिया ही नाशिक येथील रहिवासी असून तिने कॉमर्स शाखेतून शिक्षण पूर्ण केले आहे.


…नंतर दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर पृथ्वी शॉ याने आणखी एका पोस्टमधून खुलासा केला आहे. कोणीतरी माझा फोटो एडिट करून टाकला आहेच. त्याकडे दुर्लक्ष करा, असे त्याने म्हटले आहे.

3nj8bphg