बेकायदेशीर खाण प्रकरणी माजी आमदार आणि सहकाऱ्यांवर ED धाड; कोट्यवधीच्या रकमेसह अवैध माल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
former INLD legislator Dilbag Singh

इंडियन नॅशनल लोक दल (INLD) चे माजी आमदार दिलबाग सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात एका बेकायदेशीर खाण प्रकरणाच्या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) धाडी टाकून केलेल्या कारवाईनंतर बऱ्याच गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अवैध विदेशी बनावटीची शस्त्रे, तब्बल 300 काडतुसे, 100 हून अधिक दारूच्या बाटल्या, 5 कोटी रुपये रोख आणि जवळपास 5 किलो सराफा (वजनाचे मूल्य असलेले सोने किंवा चांदी) जप्त करण्यात आले आहेत. इंडियन नॅशनल लोक दलाचे माजी आमदार दिलबाग सिंग आणि त्यांचे सहकारी एका बेकायदेशीर खाण प्रकरणाच्या संदर्भात टाकलेल्या धाडीत वरील गोष्टी जप्त करण्यात आल्याचे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्यानं प्रसिद्ध केलं आहे.