
सामना प्रतिनिधी । बीड
शिवसेनांप्रमुखाच्या जयंती निमित्त बीड जिल्ह्यातील माजलगाव, वडवणी, परळी, अंबाजोगाई, केज या तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत भगव्या सप्ताहाला सुरुवात झाली. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी उपक्रम सुरू केला.
शिवसेनांप्रमुखाच्या जयंतीचे औचित्य साधून संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेत्रतवाखाली बीड जिल्ह्यात 17 जाने ते 23 जाने या कालावधीत भगव्या सप्ताहाला सुरुवात झाली आज जिल्ह्यातील वडवणी, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाने या सप्ताहाचा शुभारंभ झाला.
भगव्या सप्ताहानिमित्त शिवसैनिक गावागावात उपक्रम आयोजित करत आहेत, या सामाजिक उपक्रमात स्थानिक नागरिकांना सामावून घेतले जात आहे, या उपक्रमाचे शिवसैनिकासह नागरिकांनी उत्साहात स्वागत केले आहे.



























































