पोलीस दलाला कोरोनाने पछाडले, दुसऱ्या लाटेत 144 पोलिस पॉझिटीव्ह

pune-police

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ड्युटीला प्राधान्य देणाऱ्या शहर पोलीस दलातील 144 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लाटेतील कोरोनाने पछाडले आहेत. त्यापैकी काहीजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर लक्षणे नसलेल्यांना होमक्वारंटाईन केले आहे. पहिल्या लाटेपासून आतापर्यंत तब्बल 1 हजार 700 जणांना कोरोना झाला होता.

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच रस्त्यावर पेट्रोलिंग, नाकाबंदी आणि बंदोबस्त करणाNया पोलिसांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे . सध्या पोलिस दलातील 144 जण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर मध्यवर्ती पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व अधिकाNयांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर खूपच दक्षता घेण्यात आली. तरीही कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी बंदोबस्त करणाNया पोलिसांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढला. गेल्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः 1 हजार ४७५ पोलिसांना कोरोना झाला होता. त्यानंतर संसर्ग कमी झाल्यानंतर अ‍ॅक्टीव्ह पोलिस रुग्णांची संख्या चारपर्यंत खाली आली होती. यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे आतापर्यंत संसर्ग झालेल्या पोलिसांचा आकडा 144 पर्यंत गेला आहे. त्याशिवाय आतापर्यंत शहरातील 1 हजार 700 पोलिसांना कोरोनाची लागन झाली होती. त्यामुळे आता पोलिस दलात पुन्हा संसर्ग वाढू लागल्यामुळे वरिष्ठांकडून काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहे.

पोलीस दलातील 12 जणांचा मृत्यू

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजाविणाऱ्या12 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधितांच्या काही नातलगांना अनुकंपा तत्त्वावर पोलीस खात्यात नोकरी देण्यात आली आहे. त्याशिवाय शासनाकडून मदतीचे धनादेश नुकतेच वितरित करण्यात आले आहेत.

पहिल्या टप्प्यात 95 टक्के लसीकरण

पहिल्या टप्प्यात पोलीस दलातील 95 टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी 85 टक्के पोलिसांनी एक लस पूर्ण घेतली आहे. 10 टक्के पोलिसांनी दोनही लस घेतल्या आहेत. काही वैद्यकीय कारणामुळे पाच टक्के पोलिसांनी लस घेतलेली नाही, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या