बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणारा सराईत स्थानबद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिबवेवाडी परिसरताील नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या सराईताविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेली ही 72 वी कारवाई आहे. एमपीडीए कारवाईमुळे भाईगिरी करणाऱ्या सराईतांचे धाबे दणाणले आहेत.

गणराज ऊर्फ अण्णा सुनिल ठाकर (वय 21 रा. बिबवेवाडी) असे स्थानबद्ध केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याने साथीदारांसह कोयत्यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा, बेकायदा हत्यार बाळगण्याचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्याविरूद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी पाठविला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याला एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश दिले. ही कामगिरी वरिष्ठ विलास सोंडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वैशाली चांदगुडे यांनी केली.

72 सऱ्हाईत विविध कारागृह स्थानबद्ध

शहरातील विविध भागात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत 72 गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द करण्यात आले आहे. सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.