
प्राणघातक हल्ला करण्याच्या तयारील असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या एक पथकाने तळजाई टेकडी परिसरातून अटक केले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि काडतुसे असा मिळून 1 लाख 22 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. योगेश गणेश बोरगे (वय 23, रा. धनकवडी) आणि ऋषिकेश राजाभाऊ गरुड (वय 22 , सहकारनगर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तळजाई टेकडी परिसरात दोघेजण कोणावर तरी प्राणघातक हल्ला करण्यासाठी पिस्तूलासह थांबल्याची माहिती पोलीस अमलदार सचिन जाधव, प्रशांत गायकवाड, आणि दत्ता सोनावणे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाउन योगेश व ऋषीकेशला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 2 पिस्तूलासह 2 जिवंत काडतुसे असा 1 लाख 22 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, पोलिस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी , पोलीस अंमलदार सचिन जाधव, दत्ता सोनवणे, प्रशांत गायकवाड, इम्रान शेख, महेश बामगुडे, अशोक माने, शशीकांत दरेकर, सतिश भालेकर, विजेसिंग वसावे यांच्या पथकाने केली.



























































