पुणे – गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक, 8 किलो गांजा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

गांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 30 हजार रुपये किमतीचा 8 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त केला. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव ब्रिज या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. अमोल मधुकर खैरे (वय 30) आणि श्रीकृष्ण सुभाष देवडे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना वडगाव ब्रिज याठिकाणी दोघेजण गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वडगाव ब्रिज याठिकाणी सापळा रचून अमोल आणि श्रीकृष्ण याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा आढळला. पोलिसांनी गांजा जप्त केला असून त्यांना अटक केली आहे.