अनैतिक संबंधातून केला विवाहित महिलेचा खून, आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनैतिक संबंधातून विवाहित महिलेवर वार करून खून करणाऱ्या प्रियकर आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी भोर परिसरातून अटक केली. ही घटना सोमवारी पुणे-सातारा रस्त्यावरील शीतल लॉजमध्ये उघडकीस आली.

करुणा राधाकिसन काटमोरे (23, रा. कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सचिन राजू शिंदे (30, रा. वारजे) याला अटक करण्यात आली आहे. करुणा विवाहित असून तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती हॉटेलमध्ये काम करतो. काही महिन्यांपूर्वी तिची सचिनसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दरम्यान रविवारी, 10 जुलैला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोघेजण पुणे-सातारा रस्त्यावरील शीतल लॉजमध्ये गेले होते. त्यानंतर किरकोळ कारणावरून वाद झाल्याने सचिनने करुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला.

लॉजमधील कामगार सोमवारी, 11 जुलैला खोलीची साफसफाई करण्यासाठी गेला असता, त्याला करुणा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने तपास केला. पोलिसांनी आरोपी सचिन शिंदे याला भोरमधून ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या पथकाने केली.