बोलाई माता मंदिरात चोरी करणारा सराईत अटकेत, समर्थ पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील समर्थ पोलीस ठाणाच्या हद्दीतील बोलाई माता मंदिरातून दागदागिन्यांची चोरी करणाऱ्या सराईताला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मंदिरातील चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अनिल हौशिलाल चव्हाण (वय -31, रा. वडजाई, हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना 12 ऑगस्टला रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती.

मंदिरात चोरी झाल्यामुळे समर्थ पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्यानुसार तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणाच्या आधारे चोरट्याची माहिती गोळा केली. आरोपीची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आसपासच्या नागरिकांना दाखवून तपासाला दिशा देण्यात आली होती.

दरम्यान, 23 ऑगस्टला पथक हद्दीत पेट्रोलींग करीत असताना आरोपी मंगळवार पेठ येथे दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी अनिल चव्हाणला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये चोरी झालेली चांदीच्या घंटेसह मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, एपीआय संदीप जोरे, सतिश भालेराव, सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, महेश जाधव, सुभाष पिंगळे, शुभम देसाई, हेमंत पेरणे, विठ्ठल चोरमले, निलेश साबळे, सुमित खुट्टे यांनी केली.