पुण्यात संचारबंदीचे उल्लंघन भोवले, 85 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. मात्र, तरीही नागरीक विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 85 नागरीकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय मास्क परिधान न करणाऱ्या 2 हजार 162 जणांवर मागील दोन दिवसात दंडात्मक कारवाई केली आहे.

संचारबंदीमध्ये नागरीकानी कोणत्याही सबळ कारणाशिवाय शहरात फिरण्यास मनाई आहे. मात्र, तरीही काहीजण विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. नाकेबंदीत संबंधीत व्यक्तींना समज देऊन सोडल्यानंतरही ते ऐकत नसल्याने पोलिसांकडून कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. संचारबंदीच्या रात्री शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. सोमवारी रात्री 21 जणांवर, तर मंगळवारी 64 असे मिळून 85 जणांवर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. वारंवार सांगूनही नागरीकांकडून आदेशाचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या