पुण्यात हुक्का विक्री करणाऱ्य़ा हॉटेल डेक्कन गॅलेक्सीवर कारवाई, हुक्का पॉट जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नियमावलीचे  उल्लंघन करून हॉटेल सुरू ठेवत हुक्का विक्री करणाऱ्य़ा डेक्कन गॅलेक्सी हॉटेलवर डेक्कन पोलिसांनी कारवाई केली. त्याठिकाणाहून दोन हुक्का पॉट जप्त करण्यात आले आहेत.

डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे यांना डेक्कन गॅलक्सी हॉटेल चालू ठेऊन ग्राहकांना हुक्का व जेवण पुरविले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शिल्पा लंबे यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी हॉटेल मॅनेजर व कामगार हे जेवण पुरवित असल्याचे आढळून आले.

त्याशिवाय ग्राहकांना हुक्का विक्री करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले.  त्यानंतर  पोलिसांनी छाप्यात दोन हुक्का पॉट जप्त करीत हुक्क्याचे चार नमुणे तपासणीसाठी पाठविले आहेत. कोरोनाच्या काळात हॉटेलमध्ये ग्राहकांना जेवन देण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही हॉटेल डेक्कन गॅलेक्सीमध्ये  नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. त्यानुसार संबंधित हॉटेल मालकासह कामगारांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.