एसटीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशी ठार, हडपसरमध्ये झाला अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव एसटी चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशी ठार  झाल्याची घटना 1 डिसेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास  पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात घडली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

संजय सुदाम साळवे (वय 40, रा. रामटेकडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी एसटी  चालक चाँद सुलतान नसरुद्दीन शेख (वय 31, रा. कुंभारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत दुचाकीस्वार प्रकाश अशोक घुसर (वय 19, रा. रामटेकडी, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीस्वार घुसर आणि साळवे 1 डिसेंबरला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सोलापूर रस्त्याने निघाले होते. त्यावेळी हडपसर भागातील रामटेकडी चौकात भरधाव एसटी चालकाने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी साळवे गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. दुचाकीस्वार घुसर यांना दुखापत झाली.पोलीस उपनिरीक्षक माया गावडे तपास करत आहेत.