पुणे – दुचाकीस्वार महिलेचे दोन मोबाईल हिसकाविले

मैत्रिणीसोबत दुचाकीवरून घरी चाललेल्या महिलांचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी 24 हजारांचे दोन मोबाईल हिसकावून नेले. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास बाणेर रस्त्यावरील सिंध सोसायटीसमोर घडली. याप्रकरणी मेघा पांचाल (वय 24) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा आणि त्यांची मैत्रिणी दुचाकीवरून घरी चालल्या होत्या. त्यावेळी मेघा मैत्रिणीच्या दुचाकीवर पाठीमागे बसल्या होत्या. सिंध सोसायटी परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांचा पाठलाग केला. त्यांच्या दुचाकीचा वेग कमी झाल्याची संधी पाहून चोरट्यांनी मेघा यांच्या हातातील 24 हजारांचे दोन मोबाईल हिसकावून पसार झाले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजयकुमार लांबतुरे तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या