
मालकाच्या तिजोरीतून पाच लाखांची रोकड चोरणाऱ्याला खडक पोलिसांनी उत्तर-प्रदेशातून अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही घटना 24 मे रोजी रविवार पेठेतील दुकानात घडली होती. पिन्टु शिवलाल सरोज ( वय 23 रा.मंगळवार पेठ, मुळगाव प्रतापगड, उत्तरप्रदेश ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
रविवार पेठेतील नाथाली रिखबचंद अॅण्ड कंपनीत पिन्टू सरोज कामाला होता. त्याने दुकान बंद असताना खिडकीतून आत प्रवेश करून 5 लाखांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र तटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेश जाधव, उपनिरीक्षक राहुल खंडाळे यांच्या पथकाने आरोपीला उत्तरप्रदेशातून ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे एसीपी सतिश गोवेकर, वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, एपीआय राकेश जाधव, उपनिरीक्षक राहुल खंडाळे, तळेकर, घाडगे, शिंगे, आस्मर, गायकवाड, वाबळे, नदाफ, खरात यांनी केली.






























































