पुणेकरांचा चांगला प्रतिसाद, बहुतांश रस्ते निमर्नुष्य; प्रशासनाच्या आवाहन घरात बसून प्रतिसाद

फोटो प्रातिनिधीक

शहरातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनानुसार पुणेकरांनी रविवारी घरात बसून चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे बहुतांश रस्ते निमर्नुष्य दिसून आले. विशेषतः मार्केटयार्ड परिसरासह मध्यवर्ती शहरात पोलिसांची चोख नियोजन केल्यामुळे कोठेही गर्दी दिसून आली नाही. नागरिकांनी स्वयंशिस्तीला प्राधान्य दिल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट असल्याचा दिसून आला.

मिनी लॉकडाउन सुरु असतानाही काहीजणांनी नियमांचे उल्लंघन केले होते. त्यापाश्र्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यामुळे रविवारी बहुतांश ठिकाणांवरील व्यवहार बंद होते. परिणामी कोठेही गर्दी दिसून आली नाही. मध्यवर्ती पेठांसह सदाशिव पेठ, बाजीराव रोड, डेक्कन, स्वारगेट, एमजी रोड, कॅम्प, पुणे स्टेशन, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, कोथरूड, सिंहगड रस्ता, कर्वेनगरसह उपनगरांमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले. मागील चार ते पाच दिवसांपुर्वी मार्केटयार्डासह ठिकठिकाणी नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले होते. मात्र, पोलीस आणि संबंधित प्रशासनाने नियोजन केल्यामुळे जागोजागी शांतता होती. प्रशासनाच्या आवाहनाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे कोरोना संक्रमण कमी होण्यास मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या