पुण्यात शिक्षिकेच्या गळ्यातील सात तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होळीनिमीत्त पुजा करण्यासाठी रस्त्याने चाललेल्या शिक्षिकेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सात तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना रविवारी रात्री पाऊणे आठच्या सुमारास साईनगर कोंढवा परिसरात घडली.

याप्रकरणी 44 वर्षीय शिक्षिकेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिक्षिका महिला घरापासूनच जवळ असलेल्या ठिकाणी होळीची पुजा करण्यासाठी चालल निघाल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला हिसका मारून मंगळसूत्र चोरून नेले. महिलेने आरडा-अरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.