पुणे – वेगवेगळ्या अपघातात दोन ज्येष्ठांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव दुचाकीस्वारांनी दिलेल्या धडकेत वाकडेवाडीसह लोणीकंदमध्ये झालेल्या अपघातात दोन जेष्ठांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी खडकी आणि लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत जेष्ठ नागरिक ठार झाला. हा अपघात 14 जानेवारीला दुपारी पावणेचारच्या सुमारास वाकडेवाडीत घडला. अप्पासिंग अमृतसिंग टाक (वय 76 रा. शिवाजीनगर) असे ठार झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी रविसिंग टाक (वय 28) यांनी तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक वालकोळी तपास करीत आहेत.

भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जेष्ठ नागरिक ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात 13 जानेवारीला साडेपाच वाजण्याच्या सुमारास लोणीकंदमधील हॉटेल न्यू तोरणा खानावळीसमोर घडला. त्र्यंबक नामदेव बांगर (वय 65 रा. केसनंद, हवेली ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तात्यासाहेब भिकू हरगुडे (वय 55 रा. केसनंद ) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी बापू बांगर यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव तपास करीत आहेत.