
पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी तरूणासह जेष्ठाच्या गळ्यातील 1 लाख 43 हजारांच्या दोन सोनसाखळ्या चोरून नेल्या. ही घटना 13 जानेवारीला वाघोली गावच्या हद्दीतील बकोरी फाटा ते केसनंद फाटा प्रवासादरम्यान घडली.
या प्रकरणी विकास वाघमारे (वय 30 रा. पनवेल ) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी विकास 13 जानेवारीला पीएमपीएल बसने तुळापूर फाटा परिसरातून पुणे स्टेशन असा प्रवास करीत होते. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 1 लाख 12 हजारांची सोनसाखळी चोरून नेली. त्याशिवाय चोरट्यांनी 71 वर्षीय जेष्ठाच्या गळ्यातील 30 हजारांचा सोन्याची चैन तोडून चोरी केली. दोन्ही घटनेत चोरट्यांनी 1 लाख 43 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस अमलदार जाधव तपास करीत आहेत.
कॅम्पमध्ये महिलेला 54 हजारांचे सोन्याचे गंठण चोरीला
पुणे- महिलेकडील 54 हजारांचे सोन्याचे गंठण चोरट्या महिलेने चोरून नेल्याची घटना 13 जानेवारीला कॅम्पमधील सोनार गल्लीत घडली. या प्रकरणी 55 महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिला गंठण ओवण्यासाठी सोनार गल्लीत गेल्या होत्या. काम झाल्यानंतर सोन्याचे गंठण पिशवीत ठेउन जात असताना, चोरट्या महिलेने त्यांचा पाठलाग केला. फिर्यादी महिलेची नजर चुकवून त्यांचे 54 हजारांचे गंठण चोरून नेले. याप्रकरणी लष्कर पोलीस तपास करीत आहेत.


























































