
नुकताच आयपीएलच्या आगामी सिझनसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या वेळी कोट्यवधींची बोली लावत सर्व संघांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना संघात घेतले. मात्र या लिलावात पंजाब किंग्जची मालकीन प्रीती झिंटाने एक मोठी चूक केली. प्रीतीने तिला विकत घ्यायच्या नसलेल्या खेळाडूला बेस प्राईज 20 लाखात विकत घेतले. मात्र आपण चुकीचा खेळाडू विकत घेतल्याचे लक्षात येताच प्रितीने तत्काळ लिलावकर्ता मल्लिका सागरकडे तिची चूक सांगितले. मात्र मल्लिकाने तो लिलाव रद्द करण्यास नकार दिला. मात्र सर्वांदेखत हा प्रकार घडल्यामुळे प्रीतीच्या वेंधळेपणामुळे एका खेळाडूचा अपमान झाल्याची टीका होत आहे.
शशांक सिंग असे त्या खेळाडूचे नाव असून त्याची बोली लावली जात असतानाच प्रितीने बेस प्राईज 20 लाखातच त्याला विकत घेतले. इतर कोणत्याही संघाने त्याच्यासाठी बोली लावली नव्हती. शशांक संघात सामिल झाला व मल्लिकाने त्याचा लिलाव झाल्याचे जाहीर केले. मात्र त्याचवेळी प्रितीने चुकीचा खेळाडू विकत घेतल्याचे तिला समजले. तिने तत्काळ त्याबाबत मल्लिकाला कळवले मात्र मल्लिकाने लिलाव रद्द करण्यास नकार दिला.



























































