
राहुल गांधी यांचे वडिल व देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचे 21 मे 1991 रोजी मानवी बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सारा देश हळहळला. या हल्ल्यामागे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम अर्थात लिट्टे ही श्रीलंकेतील संघटना होती व या कटात सहभागी असलेल्यांना अटकही झाली होती. ही घटना घडली तेव्हा राहुल गांधी 21 वर्षांचे होते. आज राहुल गांधी यांनी आज भारत जोडो यात्रेच्या सांगता कार्यक्रमात याबद्दलची वेदना बोलून दाखवली. यावेळी ते भावूकही झालेले दिसले.
”मी माझ्या जीवनात हिंसा फार जवळून पाहिली आहे. त्यामुळेच मोबाइलकडे किंवा फोनकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोन वेगळा आहे. माझ्या आजीची हत्या करण्यात आली त्यानंतर सहा-सात वर्षांनी आणखी एक घटना घडली. 21 मे चा दिवस होता. मला माझ्या बाबांच्या मित्राचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं राहुल वाईट बातमी आहे. मी त्यांना म्हटलं मला समजलं आहे. बांबांचा मृत्यू झाला आहे. ज्याने हिंसा पाहिली आहे, अनुभवली आहे त्यालाच हिंसाच कळते’, असे सांगत राहुल गांधी यांनी त्यांच्या मनातली वेदना बोलून दाखवली.



























































