RSS म्हणजे जोकरांचा समूह, त्यांना इतिहासाची काहीच माहिती नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार निशाणा साधला. त्यांनी आरएसएसला जोकरांचा समूह असे संबोधत, त्यांना हिंदुस्थानचा इतिहास आणि तत्त्वज्ञानाची काहीच समज नसल्याची बोचरी टीका केली आहे.

दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आरएसएसशी लढताना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. “जर तुम्ही ब्रिटिश साम्राज्याशी लढत असाल आणि अचानक तुम्हाला भीती वाटत असेल, तर मी ते समजू शकतो. पण तुम्ही एका जोकरांच्या समूहाशी लढत आहात, मग तुम्हाला भीती कशी काय वाटू शकते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “तुम्ही शब्दशः अशा जोकरांशी आणि विदूषकांशी लढत आहात, ज्यांना आपल्या तत्त्वज्ञानाची आणि इतिहासाची अजिबात माहिती नाही.” ते म्हणाले की. त्यांच्या आरएसएसमधील मित्रांबाबतही ते हेच म्हणू शकतात, ज्यांना हिंदुस्थान अद्याप समजलेलाच नाही. हिंदुस्थानला समजून घ्यायचे असेल, तर केवळ ३,००० वर्षांपूर्वीचा इतिहास पाहून चालणार नाही, तर आजच्या वर्तमानातील हिंदुस्थानाला समजून घेणे आवश्यक आहे.”