
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व खासदारांनी महात्मा गांधी यांच्या स्मृती स्थळी भेट देत महात्मा गांधीजींना अभिवादन केले. यावेळी सर्व खासदारांनी राष्ट्रगीत म्हटले. या भेटीनंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
”याच ठिकाणी महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. आता मोदी सरकार विद्यार्थ्यांवर अमानुषपणे वागून हिंदुस्थानच्या लोकशाहीची हत्या करत आहे. विरोधी पक्ष हे अजिबात मान्य करणार नाही. मोदींना शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल व देशवासियांची माफी मागावी लागेल”, असे राहुल गांधी म्हणाले.
इंडिया गेटकडे जाण्यापासून रोखले
देशभरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे सर्व खासदार यांना इंडिया गेटकडे जाण्यापासून दिल्ली पोलिसांनी रोखले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षाचे खासदारांनी महात्मा गांधी यांच्या स्मृती स्थळी जाऊन दर्शन घेतले.




























































