
सोलापूरला महिन्याभरापासून हुलकावणी देणाऱया पावसाने मंगळवारी रात्री हजेरी लावत दिलासा दिला आहे. बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून, रस्ते चिखलमय झाले आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत 20 मि.मी. इतका पाऊस झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पावसामुळे हवेत गारवा असून, उकाडय़ाने हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काहीजणांनी पेरणी केली असून, पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीची शक्यता वर्तविली जात आहे.



























































