नक्षलवाद्यांकडून दोन युवकांची हत्याः नातेवाईक सुरक्षा दलात असल्याचा राग

 छत्तीसगढमधील सुकमाच्या दोन युवकांच्या नातेवाईकांनी सुरक्षा दलांत नोकरी स्वीकारल्याच्या रागातून नक्षलवाद्यांनी त्या दोघांचीही निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. नक्षलवाद्यांनी 15 वर्षीय ताती हडमा आणि 21 वर्षीय मडकम अर्जुन या युवकांचे घरातून अपहरण केले आणि नंतर त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. अर्जुनचा मोठा भाऊ बस्तारिया बटालियनमध्ये काम करतो तर तातीच्या वडिलांनी नक्षलवाद्यांच्या धमकीनंतर पोलिसांतील नोकरी सोडली आहे. रविवारी रात्री सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा ठाणा क्षेत्रातील मिलमपल्ली भागात या दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी माओवाद्यांनी ठेवलेल्या चिठ्ठीत या दोन्ही युवकांवर पोलिसांचे खबरे म्हणून काम केल्याचा संशय व्यक्त केला आहे. सुकमाचे पोलीस अधीक्षक के. एल. ध्रुव यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या