Lok sabha 2019: भाजपच्या विरोधात प्रचार करा; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

सामना ऑनलाईन  । मुंबई

सध्या देश धोक्यात आहे. देशात एक नवीन सुरुवात होण्याची गरज आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा हे देशाच्या राजकीय पटलावरून बाजूला होणे गरजेचे असून भाजपला मतदान करू नका. याचा फायदा कोणत्याही राजकीय पक्षाला होऊ दे, पण भाजपच्या विरोधात प्रचार करा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सभा आयोजित केली होती. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देशात होणारी लोकसभा निवडणूक ही मोदी-शहा विरुद्ध देश अशी आहे. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत देशाची वाट लावली. त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी चौकीदार प्रचार हा सापळा आहे. या चौकीदाराच्या सापळय़ात फसू नका, असे राज ठाकरे म्हणाले.