
तरुणाईने मिळवलेला हा मोठा विजय आहे. कारण जेन झींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सत्ताधाऱयांना पूर्णपणे जमिनीवर आणले. मस्तवालपणे उत्तर देणाऱ्या सरकारला माघार घ्यावी लागते हे दाखवून दिले, असे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. यामध्ये अभिजित दीपकेंचा वाटा मोठा आहे. या विजयाचा जल्लोष झालाच पाहिजे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, वीर सावरकर मार्गावर जल्लोष होईल. दीपके यापुढे जे काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा राहील, असेही राज ठाकरे म्हणाले.
भाजप विरोधी पक्षात असताना रेल्वे अपघात झाला की रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागायचे. मग आता प्रधान शिक्षणमंत्री असताना किती वेळा पेपर फुटला. 22 मुलांनी आत्महत्या केल्या. मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला इतका उशीर का लावला, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. मात्र आता ‘आम्हाला कोण काय करणार म्हणणाऱयांना तरुणांनी रस्त्यावर आणले’, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईतील आंदोलन शांततेने हाताळणाऱया पोलिसांचे राज ठाकरे यांनी अभिनंदन करून आभारही मानले.
























































