राम नवमीला 20 तास रामलल्लाचे दर्शन

अयोध्या येथील राम मंदिरात राम नवमीची तयारी पूर्ण झाली आहे. राम मंदिर सजले आहे. राम नवमीला म्हणजे 17 एप्रिल रोजी रामलल्लाचे दर्शन 20 तास खुले असेल. पहाटे साडेतीन वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. बुधवारी दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी सूर्यकिरणे रामलल्लाच्या मस्तकावर पडतील. पाच मिनिटे सूर्य तिलक होईल. त्यादृष्टीने तांत्रिक व्यवस्था करण्यात येत आहे.

व्हीआयपी दर्शन 4 दिवस बंद
16 ते 19 एप्रिलपर्यंत सर्व विशेष/व्हीआयपी सुविधा रद्द राहतील. या चार दिवसांत राम नवमी, सुगम दर्शन पास, व्हीआयपी दर्शन पास, मंगला आरती तसेच शृंगार किंवा शयन आरती पास असे कोणतेही पास दिले जाणार नाहीत. ऑनलाईन बुकिंग होणार नाही. आधीच बनवलेले पास रद्द केले जात आहेत.