नातीलाच बनवले वासनेचे शिकार, नराधम आजोबाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सतिश शिंदे । धर्माबाद

पोट भरण्यासाठी कर्नाटकातून आलेला आणि धर्माबाद येथे रोजगार करून रत्नाळी येथे रहात असलेल्या वकील लक्ष्मण कांबळे (६०) याने बारा वर्षीय नातीवर तीन वेळा बलात्कार केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लिंगपिसाट आजोबाला अटक केली आहे.

आपली नात आजारी असल्याचे पाहुन तिच्या आजीने तिला हैदराबाद येथे उपचारासाठी नेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर खोदून विचारपूस केली असता बारा वर्षीय मुलीने सर्व प्रकार आजीला सागितला. त्यानंतर संतप्त झालेल्या आजीने पीडित नातीला सोबत घेऊन हैदराबाद येथील असिफ नगर पोलीस ठाणे गाठले.

या प्रकरणी तेथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आता तो धर्माबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार धर्माबाद पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.