संतप्त गिरणी कामगारांचा एनटीसीच्या अधिकाऱ्यांना घेराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली एनटीसी होल्डिंग कंपनीला आजच मुंबईसह महाराष्ट्रातील गिरणी कामगारांच्या व्यथा लेखी पत्राद्वारे कळविण्यात येतील आणि दिल्लीवरून येणाऱया पैशातून कामगारांचा पगार प्रथम देण्यात येईल, असे आश्वासन मुंबई एनटीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाप्रबंधक कुणगुमा राजू यांनी मंगळवारी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या शिष्टमंडळाला दिले. आश्वासनापूर्वी संतप्त गिरणी कामगारांनी एनटीसीच्या अधिकाऱयांना घेराव घालत मुख्य दालनात आंदोलन छेडले. ‘गिरण्या सुरू करा, नाहीतर खुर्च्या खाली करा!’ अशा कामगारांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

मागील गुरुवारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगारांनी मुंबईतील एनटीसीच्या चारही गिरण्यांवर जोरदार ठिय्या आंदोलन छेडून पेंद्र सरकारला जाग आणली होती, पण त्यावर कोणतेही सकारात्मक पाऊल उलण्यात आले नाही. त्यामुळे मंगळवारी राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आवाहन केल्यानुसार  मुंबईतील चार गिरण्यांसह बार्शी, अचलपूर येथील एनटीसी गिरण्यातील संतप्त कामगारांनी व्यवस्थानाला घेराव घालून जाब विचारण्यात आला.

संघटनेच्या शिष्टमंडळाने एनटीसीचे नवीन महाप्रबंधक कुणगुमा राजू यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी एनटीसीचे वरिष्ठ डी. के. नासा, जनरल मॅनेजर के. सी. पवार आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने एनटीसी गिरण्या त्वरित सुरू केल्या नाहीत किंवा गेल्या पाच महिन्यांचा पगार त्वरित दिला नाही तर संतप्त कामगारांमध्ये उद्रेक होईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. यावेळी संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर, सेव्रेटरी शिवाजी काळे उपस्थित होते.