महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हयात कृषी, मत्स्य व्यवसाय तसेच पर्यटन यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. एका बाजूला पर्यावरण संवर्धन आणि दुसरीकडे जिल्हयाचा औद्योगिक विकास असे संतुलन साधत आहोत. विकास हा शाश्वत असावा आणि जिल्हा प्रगत व्हावा, यासाठी प्रशासन व शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज येथे केले.

पोलीस परेड मैदान, रत्नागिरी येथे आज त्यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, विविध शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख आदिंची उपस्थिती होती.