
जिल्हा प्रशासनाने पूर आणि भूस्खलनाबाबत अचूक माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी रिअल टाइम डेटा अक्विझिशन (RTDA) ही सिस्टम सुरू केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आता पूर आणि भूस्खलनाचा अचूक इशारा मिळणार आहे.
रत्नागिरी हा महाराष्ट्रातील एक किनारपट्टीचा जिल्हा असून तो मुंबईपासून जवळपास 300 किमी अंतरावर आहे. दरम्यान, मागच्या वर्षी चिपळूण शहराला अतिवृष्टीचा सर्वाधि फटका बसला होता आणि 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर त्याचदरम्यान कोरोना रुग्णांचा समावेशही यात होता. पुराचे पाणी आकारात घुसल्याने रुग्णालयातील काही रुग्णांचा मृत्यूही झाला होता.
आपत्तीच्या वेळी गावकऱयांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी आणि अलर्ट जारी करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत जर लोकांना त्यांचे सामान आणि गुरेढोरे घेऊन फिरता आले तर ते आर्थिक नुकसानीपासूनही काचेल. त्यामुळे मानवी जीव वाचवणे आणि आर्थिक नुकसान कमी करणे या दृष्टीने या सिस्टमचा दुहेरी फायदा होईल, असे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले.
ही एक दोन्ही बाजूंनी संपर्क साधणारी सिस्टम आहे. भूस्खलनामुळे एखादे गाव बाधित झाल्यास स्थानिक अधिकारी या सिस्टमचा कापर करून आमच्याशी संवाद साधू शकतात. अशा घटनांमध्ये मोबाईल टॉकरचा संपर्क जरी तुटला तरी आरटीडीए प्रणाली समांतरपणे कार्य करते आणि त्यामुळे स्थानिक घटनांबद्दल संवाद साधण्यासाठी वापरता येईल. शिवाय ही यंत्रणा तीन दिवस वीजपुरवठय़ाशिवायही चालू शकते, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, रत्नागिरीत तैनात करण्यात आलेली यंत्रणा दोन पाऊले पुढे आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 23 ते 25 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 110 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
जीवितहानी आणि वित्तहानीमुळे जिल्हा प्रशासनाने डेटा संकलन, विश्लेषण आणि अलर्ट जारी करण्यासाठी एक यंत्रणा उभारण्यात आली. जी पारंपरिक दळणवळण वाहिन्यांशी संपर्क तुटल्यास काम करू शकेल. ‘RTDA’ सिस्टम जिल्ह्यातील सर्क अतिवृष्टीप्रकण गाके आणि शहरे येथे सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनाला पर्जन्यमानासह पाण्याची पातळी कशा प्रकारे काढली आहे, याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. परिणामी आमच्या कामाचा प्रतिसाद सुधारेल.
- डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी
लाऊडस्पीकरने सूचना मिळणार
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने 406 गावे आणि ठिकाणे निवडून त्या ठिकाणी ही यंत्रणा बसवली आहे. त्या ठिकाणी लाऊडस्पीकरच्या सहाय्याने ग्रामस्थांना सूचना दिल्या जाऊ शकतात.
यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात हा प्रयोग केला होता
रत्नागिरी हा डोंगराळ जिल्हा असल्याने इथे मोबाईल नेटवर्क आणि वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो. अशा परिस्थितीत आरटीडीए सिस्टम महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. याआधी पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱयात अशीच सिस्टम बसवण्यात आली होती. परंतु ती मुख्यत: पुराच्या सूचनांसाठी वापरली जात होती.
































































