घरात शिळा ब्रेड उरलाय, मग बनवा ही झटपट ‘स्लाईस कुल्फी’

अनेकदा घरात ब्रेड उरतो. शिळा ब्रेड तळून किंवा फोडणीवर टाकून खाल्ला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला या शिळ्या ब्रेडची कुल्फी कशी बनवायची ते सांगणार आहोत.

साहित्य – चार ब्रेडचे स्लाईस, अर्धा वाटी साखर, अर्धा लीटर फुलक्रीम दूध, वेलची पूड, दालचिनी पूड, ड्रायफ्रूट्स

कृती – ब्रेडच्या कड्या काढून तो मिक्सरमधून वाटून घ्या. ब्रेडची पूड तयार होईल. एका पातेल्यात दूध गरम करा. दूध चांगले उकळवा व थोडे आटवून घ्या. त्यानंतर साखर टाका. वेलची पूड व दालचिनी पूड घाला. पुन्हा उकळी काढा. नंतर त्यात ब्रेडची पूड टाका. थोडा वेळ शिजवा. त्यानंतर एका पसरट भांड्यात कुल्फीचे बॅटर पसरवा. त्यावर किसलेले ड्रायफ्रुट्स घाला. भांड्याला वरून प्लास्टिक पेपरने रॅप करा व आठ तास फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर सुरीने कुल्फीचे स्लाईस पाडून गारेगार सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या