स्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी

मुंबईमध्ये मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे अपघात होऊन दुर्घटना होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास होण्याच्या दृष्टीने तसेच मुंबईतील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयं पुनर्विकासाची योजना पुन्हा सक्षमपणे सुरू करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक एल. एल. रावल यांची भेट घेऊन केली. नाबार्ड आणि आरबीआयच्या अधिकाऱ्य़ांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकास या महत्वाकांक्षी योजनेला अर्थपुरवठा करण्याच्या दृष्टीने रिर्झव्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डने काही निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध उठविण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजी नलावडे व संचालक जिजाबा पवार उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या